ज्योतिर्मय फाउंडेशनचे उद्देश

  • नागरिकांमध्ये एकता बंधुत्व व राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
  • सामाजिक प्रश्नांविषयक शिबिरे व्याख्याने आयोजित करणे.
  • सामाजिक प्रश्नांविषयी संशोधन केंद्र चालवणे.
  • सर्व प्रकारचे सामाजिक शिबिरे आयोजित करणे तसेच समाज उपयोगी कार्य करणे.
  • व्यसनांपासून लोकांना दूर ठेवणे मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवणे.
  • नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत देणे व मोफत मदत केंद्र चालवणे.
  • देशसेवेच्या कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना विशेष सहकार्य करणे.
  • पर्यटन व पर्यावरण क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम राबवणे.