शैक्षणिक

  • आजच्या यांत्रिक व स्पर्धात्मक युगाला सामोरे जाण्यासाठी व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बालवाडी,प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालये,आरोग्य विषयक महाविद्यालय,इत्यादी सर्व केंद्र व राज्य शासन मान्यता प्राप्त विषयांचे पदवी व पदविका महाविद्यालय स्थापन करून योग्य रित्या चालविणे.
  • साहित्य,विज्ञान,माहिती,तंत्रज्ञान व इतर ग्रंथ उपलब्ध करुन देणेसाठी मोफत ग्रंथालय स्थापने समाज प्रबोधनासाठी वेगवेगळ्या विषयांवर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेणे आयोजन करणे.
  • मूकबधिर मतिमंद कर्णबधिर अपंग यांच्यासाठी मोफत निवासी शाळा निर्माण करून व्यवस्थापन करणे.
  • गरीब,होतकरू व निराधार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पुरवण्यासाठी निधी उभारणे व मदत करणे.
  • अनाथ,बाल,कामगार व अशिक्षितांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबवणे.