संघटनात्मक समाजकार्यात अधिक रमणाऱ्या सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी गेले दहा वर्षांपासून ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून सातारकरांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.समाजात लोकप्रिय असलेले आणि एक अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणजे माननीय सुवर्णा नरेंद्र पाटील .समाजसेवा आणि सर्वांगीण विकासासाठी त्या प्रयत्न करत असतात.माननीय सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी स्वतःचे ज्योतिर्मय फाऊंडेशन चालू केले आहे गेल्या दहा वर्षांपासून त्या ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत.या संस्थेच्या मार्फत देशसेवेच्या कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना विशेष सहकार्य करणे तसेच नवीन आव्हाने नवे तंत्रज्ञान पर्यावरण रक्षण या संदर्भात प्राथमिक शिक्षणापासून मुलांना सक्षम करून राष्ट्रभक्ती समानता अशा गुणांचे संगोपन करून राष्ट्राची मानवी शक्ती वृद्धिंगत करून जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे. ज्योतिर्मय फाऊंडेशनचा उद्देश नागरिकांमध्ये एकता , बंधुत्व व राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे तसेच सामाजिक प्रश्नांविषयक शिबिरे व्याख्याने आयोजित करणे . सामाजिक , वैद्यकीय , शैक्षणिक , सांस्कृतिक , पर्यटन व राष्ट्रीय कार्याच्या उत्कर्षास प्रेरणा समाजात निर्माण व्हावी या सदिच्छेने ज्योतिर्मय फाऊंडेशन निर्माण करण्यात आले आहे